Posts

Showing posts from November, 2018

एकलव्य

  आज अचानकच  स्टार भारत वर पुन्हं प्रसारीत हाेत असलेली "महाभारत" ही मलिका पाहाण्याचा याेग आला. मालिका उत्तम यात शंका नाही . पण मालिकेतला प्रसंग मनात अनेक प्रश्न साेडून गेला.  प्रसंग एकलव्याचा . कथा  अशी हाेती की..... एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना जाऊन विचारले, “गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकवण्याची कृपा कराल का ?” गुरु द्रोणाचार्यांच्या समोर धर्मसंकट उभे राहिले; कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन दिले होते की, केवळ राजकुमारांनाच ही विद्या शिकवीन. एकलव्य राजकुमार नव्हता, त्यामुळे त्याला ही विद्या कशी शिकवणार? द्राेणाचार्य एकलव्याला म्हणाले, “मी तुला ही विद्या देऊ शकत नाही.” एकदा द्रोणाचार्य, पांडव, तसेच कौरव धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी अरण्यात गेले. त्यांच्या समवेत एक कुत्राही होता, जो फिरत फिरत जरा पुढे निघून गेला. तो कुत्रा एकलव्याजवळ पोहोचला. त्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला. एकलव्याने कुत्र्याला लागू नये आणि त्याचे केवळ भुंकणे बंद व्हावे, अशा रितीने सात बाण त्याच्या तोंडात मारले. कुत्रा परत गुरु द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव जिथे होते तिथे गेला. ...