Posts

Showing posts from January, 2021

पहिलं-वाहिलं

             मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय थोडा अवघडच वाटायचा. इंग्रजी येतच नव्हतं असा भाग नाही, ते समजायचं आणि परीक्षेत लिहिता देखील यायचा. पण इंग्रजीमध्ये संवाद साधन महाकठीण काम. तस माझा स्वभाव थोडा चंचलच. शाळेत अभ्यासापेक्षा वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री नाटक ह्यात जास्त रस होता. सुरेखा गायखे  मॅडम शिकवायच्या आणि पटकन  पाठांतर करून मी मनिषा आरसुळे नाटकासाठी  तयार असायची. स्टेज फिअर वैगेरे फार काही नव्हता. पण  अभियांत्रिकीला ऍडमिशन घेतल्यावर परकीयांच्या भाषेने माझी गरीबाची वाट लावली. अचानक डबक्यातला बेडूक नदीत सोडल्यावर त्याचे जे हाल होतील तसेच काहीस माझं देखील झालं. सगळं वातावरण बदललं. त्यातून न्यूनगंड निर्माण झाला.परकीयांच्या भाषेत स्वतःला इंट्रोड्युस करून देताना माझी फजिती सगळ्यांच्या पटकन लक्षात यायची. त्यातून नको तेच झालं. आत्मविश्वास कमी पडला. त्याचा परिणाम अभ्यासावर, जोडीला घरातली परिस्थिती देखील बेताचीच. सगळं कोलमडला आणि इयर ड्रॉप झाला. त्या एका वर्षात फार काही वेगळा नाही केला पण २ ३ इंग्रज...