ताे
अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात प्रवेश केला, आणि ताे मला एकदम हवा हवासा वाटु लागला. ताे दिसायला एकदम स्मार्ट , संप्पतीही खुप, बडया बापाचा. आणि मी नुसती बडबड करणारी , टेक्निकल नाॅलेज शुन्य असलेली झल्ली पाेरगी. " प्रत्येक सेमिस्टरला एक दाेन बॅक ,आणि वर फाेडणी सारखा इयर ड्राॅप " तरीसुद्धा ताेच हवा हाेता. खुप प्रयत्न करुन मी कुठेतरी त्याच्यासाठी उभ्या असलेल्या अनेकांच्या रांगेत उभी राहिले. त्याला मिळवण्याच्या शर्यतीत पहिली याेग्यता चाचणी देखील पास झाले. आता त्याच्यातल आणि माझ्यातल अंतर थाेड कमी झाल हाेत . तेवढ्यात ताे थाेडा अजुन जवळ आला , आणि कानातच म्हणाला .." पुढचा प्रवास साेबत करायचा असेल तर माझ्या काही अटी आहेत . १} तुला तुझ घर साेडून इथे परक्या शहरात याव लागेल. २} तुला काही वेळा माझ्यासाेबत रात्रीच्या वेळी सुद्धा राहाव लागेल. ( घरचे साेडतील का?) ३} मी तुझ्यासाेबत लग्न करणार नाही , पण जाेवर मी आहे ताेवर तुलाही दुसर्या मुलासाेबत लग्न करता येणार नाही. ( हे तर जास्तच झाल हा. ) ४} आणि २ वर्षाच्या आत जर तु माझ्यासाेबत काडीमाेड घेतला, तर तुला मला २ ला...