आयुष्याच्या नव्या वळणावर
वर्ष 2019 मध्ये मी ज्याच्या शोध थोडे दिवस थांबवला होता त्याचा हा भाग 2 or लाईफ अपडेट समजा हवं तर. https://musicalmanu.blogspot.com/2019/01/blog-post.html कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब लग्न झाल्यावर करणार अस finally ठरल्यावर मी जवळच एका शाळेत पार्ट टाइम कामाला रुजू झाले. ह्याने दोन गोष्टी साध्य झाल्या एकतर माझ्या खर्चा पुरते पैसे कमवून मी स्वावलंबी व्हायचा पहिला प्रयत्न केला आणि दुसरी अशी की लहान मुलांमध्ये माझा वेळ मस्त जाऊ लागला. पण लवकरच ,2020 च्या सुरवातीलाच कोरोना संसर्ग पसरल्यामुळे शाळा कॉलेज आणि सगळाच एकूणच ठप्प झाला. पुन्हा पूर्ण वेळ घरात राहत असताना मी स्वतःला काहीतरी ऍक्टिव्हिट मध्ये गुंतवून ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागेल. 2021 या दरम्यान इंस्टाग्राम वर एक जाहिरात पाहून apply केलं आणि wfh करत एक पुस्तक प्रकाशन कंपनी साठी automation च्या स्क्रिप्ट लिहायचे काम चालू ठेवले. त्यातच घरच्याना वाटले की हीच ती वेळ जेव्हा मी लग्न करायला हवं. कोरोना सगळीकडे दहशत पसरवत असताना, माझं लग्न अगदीच अचानक आणि अनपेक्षित पार पड...