पहिलं-वाहिलं

          मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय थोडा अवघडच वाटायचा. इंग्रजी येतच नव्हतं असा भाग नाही, ते समजायचं आणि परीक्षेत लिहिता देखील यायचा. पण इंग्रजीमध्ये संवाद साधन महाकठीण काम. तस माझा स्वभाव थोडा चंचलच. शाळेत अभ्यासापेक्षा वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री नाटक ह्यात जास्त रस होता. सुरेखा गायखे  मॅडम शिकवायच्या आणि पटकन  पाठांतर करून मी मनिषा आरसुळे नाटकासाठी  तयार असायची. स्टेज फिअर वैगेरे फार काही नव्हता. पण  अभियांत्रिकीला ऍडमिशन घेतल्यावर परकीयांच्या भाषेने माझी गरीबाची वाट लावली. अचानक डबक्यातला बेडूक नदीत सोडल्यावर त्याचे जे हाल होतील तसेच काहीस माझं देखील झालं. सगळं वातावरण बदललं. त्यातून न्यूनगंड निर्माण झाला.परकीयांच्या भाषेत स्वतःला इंट्रोड्युस करून देताना माझी फजिती सगळ्यांच्या पटकन लक्षात यायची. त्यातून नको तेच झालं. आत्मविश्वास कमी पडला. त्याचा परिणाम अभ्यासावर, जोडीला घरातली परिस्थिती देखील बेताचीच. सगळं कोलमडला आणि इयर ड्रॉप झाला. त्या एका वर्षात फार काही वेगळा नाही केला पण २ ३ इंग्रजी पुस्तक वाचली आणि स्वतःशीच इंग्रजीत बोलू लागले . आणि  मग ठरवूनच टाकला आता मीही इंग्रजी बोलणारच . 

        एक वर्ष प्रतीक्षेनंतर पुन्हा सेकंड इयर ला ऍडमिशन घेतला आणि ठरवनच टाकला आता मागे हटायचं नाही.  माहिती तंत्रज्ञान विभागाच्या   विभागप्रमुख आणि माझ्या मेन्टॉर प्रीती भामरे मॅडम आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख मुरुगकर सर ह्यांचा कम्म्युनिकेशन स्किल्स वर असलेला जिव्हाळा आणि त्याला गौरांग अंबुलकर सरांची मेहनत आणि काही गुणी सिनिअर्स मुळे स्पॉटलाइट इव्हेंट सुरुवात होऊन २ वर्ष झालेली होती. मग मीही ठरवूनच  स्पॉटलाइटच्या प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतला. आणि मग विषयाची शोधांशोध त्याच पीपीटी मध्ये नीट सादरीकरण आणि स्टेज वर बोलायचं कस ह्याची तयारी सुरु झाली. कर्म करत राहा फळाची अपेक्षा नको म्हणून स्टेज वर चढले आणि इतकयात  प्रेझेंटेशन झाला. आणि तब्बल ८ दिवसांनंतर  स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला आणि त्यात मला देखील बक्षीस मिळालं. त्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा त्याच ह्याच स्पर्धेत बक्षीस मिळवला. आणि मग आत्मविश्वास सुद्धा परत मिळवला. कॉलेज च्या स्नेहसंमेलनात सूत्रसंचालनाची संधी मिळवली. कॉलेज मध्ये थोडं बहुत नाव कमवला.  मातृभाषेत अनेकदा छोटी छोटी बक्षीस मिळवलेल्या माझ्या साठी परकीयांच्या भाषेत मिळवलेला हे पहिलं वाहिलं बक्षीस कायमच मनाच्या खूप जवळ असेल. 

Comments

Popular posts from this blog

ताे

आयुष्याच्या नव्या वळणावर

ते बाळ आता मरणाची वाट बघतय.