एकलव्य


  आज अचानकच  स्टार भारत वर पुन्हं प्रसारीत हाेत असलेली "महाभारत" ही मलिका पाहाण्याचा याेग आला. मालिका उत्तम यात शंका नाही . पण मालिकेतला प्रसंग मनात अनेक प्रश्न साेडून गेला.  प्रसंग एकलव्याचा . कथा  अशी हाेती की.....
एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना जाऊन विचारले, “गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकवण्याची कृपा कराल का ?”
गुरु द्रोणाचार्यांच्या समोर धर्मसंकट उभे राहिले; कारण त्यांनी पितामह भीष्मांना वचन दिले होते की, केवळ राजकुमारांनाच ही विद्या शिकवीन. एकलव्य राजकुमार नव्हता, त्यामुळे त्याला ही विद्या कशी शिकवणार? द्राेणाचार्य एकलव्याला म्हणाले, “मी तुला ही विद्या देऊ शकत नाही.”
एकदा द्रोणाचार्य, पांडव, तसेच कौरव धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी अरण्यात गेले. त्यांच्या समवेत एक कुत्राही होता, जो फिरत फिरत जरा पुढे निघून गेला. तो कुत्रा एकलव्याजवळ पोहोचला. त्याला पाहून कुत्रा भुंकायला लागला.
एकलव्याने कुत्र्याला लागू नये आणि त्याचे केवळ भुंकणे बंद व्हावे, अशा रितीने सात बाण त्याच्या तोंडात मारले. कुत्रा परत गुरु द्रोणाचार्य, पांडव आणि कौरव जिथे होते तिथे गेला.
गुरु द्रोणाचार्य तर वचन देऊन बसले होते की, अर्जुनासारखा धनुर्धर दुसरा कोणीही होणार नाही; पण हा दुसरा कोणीतरी अधिक शिकलेला धनुर्धर होता. गुरूंपुढे धर्मसंकट निर्माण झाले. एकलव्याची अतूट श्रद्धा पाहून गुरुदेवांनी विचारले, “माझ्या मूर्तीसमोर बसून तू धनुर्विद्या शिकलास, असे म्हणालास; पण गुरुदक्षिणा दिली नाहीस.”
एकलव्य : आपण जी मागाल ती गुरुदक्षिणा देईन.
गुरु द्रोणाचार्य : तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे !
एकलव्याने एका क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला.
  तर  अशी ही कथा आपल्या सर्वानाच ठाउुक आहे . पण पुढे एकलव्याच काय झाल?   हे कुणाला माहीत आहे का ? त्याच्या एकनिष्ठतेच  हेच का फळ ? एखाद्याच्या चांगुल पणाचा इतका फायदा का उचलताे  आपण ?  एक कथा बनुनच का उराव त्याने ?असे अनेक प्रश्न आणि एक अपुर्ण कथा .


मनिषा आरसुळे.

Comments

  1. The entire plot of MAHABHARATA stares that life isn't fair. There are all types of characters & their stories.
    We should see that how someone's character/nature affects the behaviour of others.
    It also states that, being good doesn't solve all the problems.
    And now talking specifically about EKLAVYA, he was a very good person but, he was also obsessed with being good, which did caused his own downfall.
    That's why the start of MAHABHARATA is the new Era of Kaliyuga.

    ReplyDelete
  2. Khup Chhan Manisha 👍👍 Keep it up. you are on the way to become a great writer😊😊👍

    ReplyDelete
  3. But the most strange thing is that there's neither Eklavya left in us nor Dronacharya. Everyone wants to become Arjuna and Every dron wants to teach you as long as u are paying him money. That's y Coaching classes are doing well.

    ReplyDelete
  4. Nice, very good....

    ...Shankar Narayan

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ताे

आयुष्याच्या नव्या वळणावर

ते बाळ आता मरणाची वाट बघतय.