माझ्या टोपणनावाची गोष्ट

        माझं नाव मनिषा, मनिषा राजाराम आरसुळे. तसं पाहिलं तर मला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने माझं अवलोकन करुन मला नवी नवी नाव देतच असते. त्यातली काही सागंयची ठरली तर मनु, मनटे, मुस्कान. आई प्रेमाने  माई म्हणते तर आजोबा माया. पण एक प्रसंग आणि त्यामुळे मला मिळालेली नविन ओळख सदैव  अंतरी राहिल.
       अभियांत्रिकीच्या तिस-या वर्षी  NSS camp ला जाण्याचा योग आला. Camp वैगेरे माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता, पण अस म्हणतात अनुभवातून माणूस घडतो. त्या निमित्ताने निफाड तालुक्यातील चितेगाव पाहायला मिळाल.  शिबिरातली काम सोपं व्हावी म्हणून संघ केलेले असायचे.  मयुर, प्रगती, अर्चना, क्रांती, नम्रता, मधुरा, शुभंम, राहुल, अनुज, सागर, हर्ष  आणि विशाल असा आमचा संघ. एकदा संघासोबत गावातुन फेरफटका मारताना एक  आजी भेटली. तिने आम्हाला थांबवुन घेतल. मला औषध आणुन द्या असं म्हणत पाया पडु लागली. बाजुला उभी असलेली मी आजीला म्हणाली “अहो आजी नका पाया पडू आणुन देतो औषध”. आजीला नीट ऐकायला गेलं नाही कदाचित आणि वर मान करुन  पाहील तर जीन्स आणि टी-शर्ट परिधान केलेली मी आजीला मुलगाच भासले. आमच्यातल्या एकाला पाहून ती माऊली बोलली “काय म्हणतो हा भाऊ ?”. त्यावर आमच्या ग्रुप मधे जोरदार हवा पिकला. नंतर आजीला औषधं नेऊन दिले आणि खूप सारा आशिर्वाद घेतला. पण त्याबरोबरच मला मिळाली ती एक नवीन ओळख, एक नवीन नाव. आणि एरवी कुणाचीतरी मुलगी, बहीण, मैत्रीण, विद्यार्थीनी म्हणुन वावरणारी मी त्या क्षणापासून माझ्या ‌‌‌‌NSS group ची भाऊ झाले होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ताे

आयुष्याच्या नव्या वळणावर

ते बाळ आता मरणाची वाट बघतय.