आयुष्याच्या नव्या वळणावर

वर्ष 2019 मध्ये मी ज्याच्या शोध थोडे दिवस थांबवला  होता त्याचा हा भाग 2 or  लाईफ अपडेट समजा हवं तर.

 https://musicalmanu.blogspot.com/2019/01/blog-post.html


कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब लग्न झाल्यावर करणार अस finally ठरल्यावर मी जवळच एका शाळेत पार्ट टाइम कामाला रुजू झाले. ह्याने दोन गोष्टी साध्य झाल्या एकतर माझ्या खर्चा पुरते पैसे कमवून  मी स्वावलंबी व्हायचा पहिला प्रयत्न केला आणि दुसरी अशी की लहान मुलांमध्ये माझा वेळ मस्त जाऊ लागला. पण लवकरच ,2020 च्या सुरवातीलाच कोरोना संसर्ग पसरल्यामुळे शाळा कॉलेज  आणि सगळाच एकूणच ठप्प झाला.  पुन्हा पूर्ण वेळ घरात राहत असताना मी स्वतःला काहीतरी ऍक्टिव्हिट मध्ये गुंतवून ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागेल.  2021 या दरम्यान  इंस्टाग्राम वर एक जाहिरात पाहून apply केलं आणि wfh करत एक पुस्तक प्रकाशन कंपनी साठी automation च्या  स्क्रिप्ट लिहायचे काम चालू ठेवले. त्यातच घरच्याना वाटले की हीच ती वेळ जेव्हा मी लग्न करायला हवं.  

कोरोना सगळीकडे दहशत पसरवत असताना, माझं लग्न अगदीच अचानक आणि अनपेक्षित पार पडलं. कुटुंबीय, समाज, आणि त्यांच्या विचारांनी बनवलेल्या त्या बंधनात मी पुरती बांधून गेले होते. ह्या नव्या नात्यानं घरच्याना जरी सगळच  “योग्य” आणि “परिपूर्ण” आहे अस वाटत असलं तरी, माझ्या मनाला ते कधीच जुळलं नाही.

लग्नानंतर सुरुवातीच्या काही दिवसांतच मी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते, अभ्यासही चालू होता. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी निर्माण करायचं ठरवलं. संसार नवरा आणि भविष्य ह्याबाबतीत मी अनेक स्वप्न रंगवत होते  पण नवऱ्याची वागणूक मात्र वेगळीच होती.

लग्नानंतर काही दिवसांतच लक्षात आल होत की तो फक्त दुसऱ्याच्या  पैशांवर आणि विचारावर निर्णय घेणारा गैरजबाबदार मुलगा होता. आमच्या नात्यात मला त्याच्याकडून मानसिक, शारीरिक और फिनॅन्सियली कुठलीच सुरक्षितता जाणवत नव्हती.

त्याच्याकडून ऐकायला मिळायचं ते फक्त "तुला कोण आयत खाऊ घालेल?" असे शब्द आणि हात जो मारण्यासाठी वर यायचा. ह्या सगळ्यात शिक्षण थांबू नये म्हणून MBA ला ॲडमिशन घेतलं.

त्याच काळात, माझं पहिलं जॉब मिळाला. आयुष्यातली दुसरी मोठी जबाबदारी. दिवसा ऑफिस, रात्री घरातलं मानसिक रणांगण. डोक्यावर प्रेशर, घरकाम, आणि मनात कुठेतरी एक आवाज "हे सगळं का करत आहेस तू?"

आता कुठेतरी सगळा सुरळीत होईल म्हणून मी सुटकेचा श्वास टाकणार इतक्यात त्याच करत असलेला काम सुटल. त्याच्या घरी असतानाच्या ह्या कालावधीत मला त्याच्या बद्दल अनेक नव्या गोष्टी समजल्या. जस की त्याला साध मातृभाषेत लिहिता वाचता देखील येत नाही, पैसे कसे कुठे आणि किती वापरावे ह्याचा अंदाज नाही आणि त्यांनी पुन्हा नवीन काम मिळाव  म्हणून धडपड करण ही नाही. मी हातपाय मारत राहिले, त्याला समजवण्याचा बराच प्रयत्न  मी केला. कधी एकटीने . कधी घरच्याना सांगून, तर कधी मध्यस्थीना सोबत घेऊन. आपलं काहीतरी छान भविष्य असावं,  भलं व्हावं  अन उद्या आपल्याला बाळ झालं तर त्यांना शिकवता यावं म्हणून तरी   अभ्यास कर अस समजावून ही तो गोष्टींची टाळाटाळ करत असायचा.  आपल्या मुलांना शाळा शिकवेल अशी त्याची उत्तर असायची, अस सगळा चालू असताना त्याला फक्त सोपं आयुष्य हवं होतं. शिकायचं नाही, जगायचं नाही, भविष्यासाठी झटकायचं नाही.  एव्हाना त्याने माझ्या माहेरचे कॉल उचलणं देखील बंद केला होत . कारण त्याच्या कडे माझ्या घरच्यांच्या प्रश्नांची उत्तर नव्हती.  आणि प्रत्येक जाणाऱ्या क्षणात मला माझं त्याच्या बरोबर व भविष्य अंधारात दिसत होत. तरीही लोक लाजे खातर , आई वडिलांचा मान ठेवायचा म्हणून मी त्याच्या जवळ संसार करतच होते.

पण तो दिवस आयुष्यात धग बनून आला जेव्हा माझ्यावर उठणारा हात  त्याने माझ्या आईवर उचलला. तेव्हा जो पाय मी घराबाहेर टाकला तो कायमचाच.  ह्या एका घटनेनं  माझ्या वेगळा होण्याचा माझ्या निर्णयाला दुजोरा दिला आणि आम्ही वेगळे झालो. 

हा घटस्फोट होऊन आता जवळ जवळ एक वर्ष होत आलंय.  आई बाबा पुन्हा मुलगा बघताय .  मला आता माझं आयुष्य माझ्या अटी आणि शर्ती वर जाण्याची सवय लागतेय. माझं MBA  देखील मी जिद्दीने पूर्ण केलंय. या अनोळखी शहरात एकटं  राहताना येणाऱ्या अडचणींना मी धीराने समोर जातेय. भविष्य कस असेल ते माहित नाही पण पार्टनर ची निवड चुकली ( मग ते love marriage मध्ये तुमची असो  किंवा  arragnged marriage मध्ये घरच्यांची ) की त्याचा काय मनस्ताप होतो ह्याचा चांगलाच प्रत्यय मला आलाय.  जस मागच्या वेळी एक कॉर्पोरेट जॉब साठी मेनिफेस्ट केलं होत तस आता  लाईफ पार्टनर साठी करतेय.  कदाचित आता देव ऐकेल आणि माझा संसार पण सुखाचा करेल, ह्या अपेक्षेत आता थांबतेय. तुम्हीही तुमच्या निर्णयात सावध राहा, कारण आयुष्याचा आनंद आणि शांती तुमच्या निवडीत असते.





Comments

  1. शेवटची ओळ खूप महत्त्वाची - निर्णयात सावध राहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ताे

ते बाळ आता मरणाची वाट बघतय.